भयंकर! कारखान्यातून अमोनिया गॅस गळती; कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास, परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:10 AM2022-04-29T10:10:58+5:302022-04-29T10:17:33+5:30
Jhajjar Factory Ammonia Gas Leak: कात बनवणाऱ्या कारखान्यात अमोनिया गॅस (Ammonia Gas Leak) सिलिंडरमधून बाहेर पडणाऱ्या पाईपला गळती लागली होती. या गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली - हरियाणातील (Haryana) झज्जरमध्ये (Jhajjar) एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना (big accident) घडली. कात बनवणाऱ्या कारखान्यात अमोनिया गॅस (Ammonia Gas Leak) सिलिंडरमधून बाहेर पडणाऱ्या पाईपला गळती लागली होती. या गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, गॅस गळतीनंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, उलट्या होऊ लागल्या. याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कात बनवण्याच्या प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ मदतीसाठी आले. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितलं. तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले असून आजूबाजूचा काही भाग पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. सुरू असलेली दुकानेही पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केली.
A gas leak was reported at a factory in Jhajjar district of Haryana on Thursday* evening
— ANI (@ANI) April 28, 2022
"Incident of ammonia gas leakage reported. 3 ambulances and 3 to 4 fire brigades are available here. Advised people to wear masks," said Jag Niwas, Addl. Deputy Commissioner, Jhajjar. pic.twitter.com/0YlrOhKcFd
कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून कारखाना परिसरापासून सर्वांनाच दूर जाण्यास सांगण्यात आलं. अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पाण्याचा फवारा मारला. कारखान्याच्या टाकीतून निघणाऱ्या पाईपमधून अमोनिया गॅसची गळती होत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.