हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 02:36 PM2024-11-17T14:36:20+5:302024-11-17T14:36:48+5:30

रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.

jhansi hospital fire man saves many babies lost his girls yakoob mansuri | हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या

हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या

झाशी रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान याकुबने हिंमत दाखवत देवदूत बनून इतर मुलांचा जीव वाचवला. पण त्याच्यासोबत मात्र अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. त्याने आगीतून इतर मुलांचा जीव वाचवला पण स्वत:च्या दोन मुली गमावल्या. 

TOI च्या रिपोर्टनुसार, ज्यांची मुलं वाचली त्यांच्यासाठी २० वर्षीय याकुब शुक्रवारी रात्री देवदूत होता. मात्र, ज्याने इतरांचा जीव वाचवला, तो आपल्याच नवजात जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही. हमीरपूरचा याकूब हा त्याची पत्नी नजमासोबत महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात बालकांच्या आयसीयू वॉर्डबाहेर आठवडाभर राहत होता. 

शुक्रवारी रात्री आग लागली तेव्हा याकुबने खिडकी तोडली. जीवितहानी टाळण्यासाठी आणि मुलांना वाचवण्यासाठी तो आत शिरला. त्याच्या दोन्ही मुली त्या मुलांमध्ये नव्हत्या ज्यांना त्याने मरणाच्या दारातून वाचवलं होतं. तो त्याच्याच मुलींना वाचवू शकला नाही. आगीमध्ये दहा मुलांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच अनेकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. 

निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट

झाशी येथील मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून त्यामध्ये कोणतेही षडयंत्र किंवा निष्काळजीपणा समोर आलेला नाही. घटनेच्या वेळी एनआयसीयू वॉर्डमध्ये ६ नर्स, इतर कर्मचारी आणि २ महिला डॉक्टर उपस्थित होत्या. स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडली आणि आग लागली.

Web Title: jhansi hospital fire man saves many babies lost his girls yakoob mansuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.