अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 01:35 PM2019-06-06T13:35:13+5:302019-06-06T13:35:42+5:30

उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

jhansi officer employee does not respect then beating with shoes bjp mla | अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं

googlenewsNext

ललितपूरः उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ललितपूर जिल्ह्यातील महरौनी कस्बेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना बुटांनी मारा, असं हे महाशय म्हणाले आहेत.

सहन करण्याचीही एक मर्यादा असते, काही अधिकारी आणि कर्मचारी सपा, बसपाच्या मानसिकतेचे आहेत. त्यांना सुधारण्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ देतो आहे, त्यांनी महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक प्रकारे इशारा दिला आहे. जेव्हा त्यांनी कार्यक्रमात हे विधान केलं, तेव्हा मंचावर श्रम आमि सेवायोजन राज्यमंत्री मनोहर लाल पंथ आणि नवनिर्वाचित खासदार अनुराग शर्मा उपस्थित होते.

कुशवाह म्हणाले, 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पार्टीचं सदस्यता घेण्यासाठी दबाव बनवला आहे. कार्यकर्त्यांच्या योग्य मतालाही अधिकारी किंमत देत नाहीत. रामरतन कुशवाहा यांच्या विधानावरून राज्यमंत्री मनोहर लाल पंथ आणि खासदार अनुराग शर्मा यांनी हात झटकले आहेत. 

Web Title: jhansi officer employee does not respect then beating with shoes bjp mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.