झारखंडमधील चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:21 AM2019-01-29T10:21:34+5:302019-01-29T10:29:46+5:30
झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
रांची - झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) पहाटे चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहभूम जिल्ह्याच्या खूंटी- चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या भागात नक्षलींविरोधात सुरक्षा दलांनी अभियान राबवले होते. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एकूण पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 2 एके 47, 2 पिस्तूल आणि एक 303 रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
#UPDATE Security forces recover bodies of two more Naxals; Search operation underway. https://t.co/emdUjhXZSW
— ANI (@ANI) January 29, 2019
Jharkhand: Security forces neutralised three naxals during an encounter in West Singhbhum district, early morning today. Two-AK 47s, one 303 rifle and two pistols recovered, search operation underway.
— ANI (@ANI) January 29, 2019