कोरोना संकटात मालामाल झाले 'हे' राज्य सरकार; सापडला 250 किलो सोन्याचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 02:24 PM2020-06-04T14:24:50+5:302020-06-04T14:38:18+5:30
झारखंड सरकारने आता या खाणीच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे.
जमशेदपूर : देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना झारखंड सरकार मालामाल झाले आहे. झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारी खाणीत 250 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे.
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी खाणीत सोन्याचे साठे सापडल्याचा अहवाल राज्याचे खाण सचिव सचिव अबूबकर सिद्दीकी यांना सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भीतरडारी खाणीमध्ये 250 किलो सोन्याचा साठा आहे.
झारखंड सरकारने आता या खाणीच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. भीतरडारी खाणीत सोन्याचे साठे शोधण्याचे काम भूगर्भतज्ज्ञ पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यात वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचे प्रमाण आढळले आहे. विविध व्हरायटीच्या सोन्याच्या धातूंचे 250 किलो सोने बाहेर येण्याची शक्यता आहे.
भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, झारखंड देशातील सोन्याचे ठिकाण असलेले राज्य असण्याची शक्यता आहे. यापूर्वी लावा, कुंदरकोचा, पहाडडीहा आणि पारसी येथे सोन्याचे साठे सापडले आहेत. राज्यात आणखी सात ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत आहेत. येत्या काही दिवसांत या जागांवरील खाणींचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात येईल आणि सोन्याचा शोध घेतला जाऊ शकतो.
रांची ते तमाडच्या दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बर्याच ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण चाळण्याचे कामही सुरू आहे, असेही भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.
आणखी बातम्या
CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा
Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार
बायको असावी तर अशी... पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण...
Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…