झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:35 AM2024-11-23T09:35:23+5:302024-11-23T09:36:29+5:30
Jharkhand Assembly election 2024 Result: महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणूक झालेल्या झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांमधील एनडीए यांच्यामध्ये अटीतटीटी लढत दिसत आहे.
महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणूक झालेल्या झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांमधील एनडीए यांच्यामध्ये अटीतटीटी लढत दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण ८१ जागांपैकी ७५ जागांचे कल समोर आले आहे. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ३९ जागांवर तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे.
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झालं होतं. राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडीसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी विरुद्ध भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली होती.