BREAKING: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगानं राज्यपालांना दिला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:17 PM2022-08-25T12:17:25+5:302022-08-25T12:18:51+5:30
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे.
रांची-
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. आयोगानं आपला अहवाल सादर केला असून सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी राहीलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार निवडणूक आयोगानं याप्रकरणातील सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगानं यासंदर्भातील पत्र देखील राज्यपालांना पाठवलं आहे.
ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आमदारकीवर टांगती तलवार असताना त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. भाजपचे गोड्डा मतदार संघातील खासदार डॉ निशिकांत दुबे यांनी नुकतंच ट्विट करून झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नीच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की सीएम हेमंत सोरेन हे देखील आता बिहारमध्ये २५ वर्षांपूर्वी ज्यापद्धतीनं राजद प्रमुख लालू प्रसाद यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री करुन धक्का दिला होता. त्याचधर्तीवर आता झारखंडमध्येही प्रयोग केला जाऊ शकतो. लालू प्रसाद यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडण्यापूर्वी पत्नी राबडी देवी यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं होतं. आता मुख्यमंत्री हेमंत सोरेनही त्याच मार्गावर चालणार असल्याची चर्चा आहे.
प्रकरण काय?
- हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत स्वत:च्या भावाच्या कंपन्यांना खाणी लीजवर दिल्याचा आरोप आहे.
- त्यावेळी हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदासोबतच खनिज मंत्रालयाचीही जबाबदारी पार पाडत होते.
- ईडीनं नुकतंच खणीकर्म सचिव पूजा सिंघल यांना मनीलाँड्रींग प्रकरणात अटक केली. पूजा यांनीच खाण प्रकल्पात लायसेन्स जारी केले होते.