झारखंडमध्ये कोळसा खाणीत जमीन खचली, 10 जणांचा मृत्यू
By admin | Published: December 30, 2016 09:37 AM2016-12-30T09:37:22+5:302016-12-30T14:33:12+5:30
झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Next
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 30 - झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 10 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 40 ते 50 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही मशिन्सदेखील अडकल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरफ) टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. दुर्घटना झाली तेव्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) एक तुकडी घटनास्थळी होती, मात्र त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नसून सर्व सुरक्षित आहेत. ही खाण ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची आहे. गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय गावात ही दुर्घटना घडली आहे.
ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून सीआयएसएफचे दोन अधिकारी आणि 21 कॉन्स्टेबलना घटनास्थळी पाठवलं आहे. सध्या दोन लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींनी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Jharkhand (Lalmatia) mine collapse: 40-50 workers feared trapped under the debris, rescue operations on. NDRF team from Patna on the way. pic.twitter.com/fYyK0XAhmI
— ANI (@ANI_news) 30 December 2016
धुक्यामुळे रात्री बचावकार्य सुरु करण्यात अडथळा आल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली, आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. जमीन खचल्याने जवळ असणारे विजेचे खांब कोसळल्याने परिसरात अंधार झाला होता. ज्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
मुख्यमंत्री रघुबर दास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी संबंधित अधिका-यांकडून बचावकार्याची पुर्ण माहिती घेतली आहे.
Jharkhand mine collapse: CM Raghubar Das monitoring situation closely, asks concerned officials to intensify rescue operations.
— ANI (@ANI_news) 30 December 2016