झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भन्नाट आयडिया; पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:42 PM2022-01-20T20:42:23+5:302022-01-20T20:42:42+5:30

आता सरकारच्या द्विवर्षपूर्तीमुळे हेमंत सोरेन यांनी २६ जानेवारीपासून हा नियम अंमलात आणणार असल्याचं सांगितले आहे

Jharkhand Government Launch Petrol Subsidy Scheme to Two Wheelers | झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भन्नाट आयडिया; पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळणार

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भन्नाट आयडिया; पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळणार

Next

नवी दिल्ली – पेट्रोलच्या वाढत्या किंमतीने प्रत्येक जण त्रस्त आहे. अशावेळी जर कुठल्या राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात २-४ रुपयेही कपातीची घोषणा केली तरी लोकं खुश होतात. मागील काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी २ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पेट्रोलच्या किंमती २५ रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. सोरेन यांच्या निर्णयाने देशात सगळीकडे त्यांचे कौतुक झाले.

आता सरकारच्या द्विवर्षपूर्तीमुळे हेमंत सोरेन यांनी २६ जानेवारीपासून हा नियम अंमलात आणणार असल्याचं सांगितले आहे. राज्य सरकार येत्या २६ जानेवारीपासून टू व्हिलर्सवर पेट्रोल सब्सिडी देण्याची योजना आखत आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ एक काम करावं लागेल. पेट्रोल सब्सिडीचा फायदा घेण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सीएम सपोर्ट नावाचं App लॉन्च केले आहे. राज्य रेशन कार्डधारकांना या App च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावं लागेल.

प्रत्येक महिन्याला किती सब्सिडी मिळणार?

वेबसाइट http://jsfss.jharkhand.gov.in वर जाऊनही रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे. पेट्रोल सब्सिडी योजनेचा फायदा अशा रेशन कार्ड धारकांनाच मिळेल ज्यांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेतंर्गत झारखंड राज्यात रेशन कार्डवर खाद्य सुविधा दिली जाते. राज्य सरकारच्या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लोकांना २५ रुपये प्रति लीटर सब्सिडी दिली जाईल. ही सब्सिडी महिन्याला १० लीटर पेट्रोलपर्यंत असेल. म्हणजे एक रेशनकार्ड धारक महिन्याला २५० रुपयांपर्यंत सब्सिडी घेऊ शकतो. सब्सिडीचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केले जातील.

राज्य सरकारच्या योजनेसाठी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशांनाच त्याचा फायदा होणार आहे. रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे. सब्सिडीचा फायदा केवळ झारखंडमध्ये रजिस्टर्ड झालेल्या दुचाकींनाच देण्यात येणार आहे.

अशी नोंदणी करा

सर्वप्रथम CMSUPPORT अॅप उघडा किंवा http://jsfss.jharkhand.gov.in ला भेट द्या.

रेशनकार्ड आणि आधार क्रमांकाशी संबंधित माहिती येथे टाका.

सबमिट केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.

ओटीपी सबमिट केल्यावर, पडताळणी पूर्ण होईल.

लॉग इन करण्यासाठी, युजर आयडीमध्ये रेशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.

कुटुंब प्रमुखाच्या आधार क्रमांकाचे शेवटचे ८ अंक हा पासवर्ड असेल.

लॉगिन केल्यानंतर, शिधापत्रिकेत तुमचे नाव निवडा.

आता वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक सबमिट करा.

डीटीओ या माहितीची पडताळणी करेल.

पडताळणी केल्यावर तुमचे नाव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पोहोचेल.

त्यानंतर दर महिन्याला तुमच्या खात्यात पेट्रोल सबसिडी जमा होत राहील.

Web Title: Jharkhand Government Launch Petrol Subsidy Scheme to Two Wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.