CM सोरेन यांना अटक होणार? DIG-IG सह मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 07:14 PM2024-01-31T19:14:35+5:302024-01-31T19:15:05+5:30
जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज दुपारपासून ED चौकशी सुरू आहे.
Jharkhand Hemant Soren (Marathi News): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची दुपारपासून ED चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी हालचाल वाढली आहे. डीजीपी आणि मुख्य सचिव निवासस्थानी पोहोचले असून, रांचीमध्ये कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत वाढवण्यात आली आहे.
सुरक्षेत वाढ
सीएम हाऊस, राजभवन आणि ईडी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात पुढील आदेश येईपर्यंत कलम 144 लागू राहील. राजभवनाबाहेर सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन टुरिस्ट बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे, हेमंत सरकार आपल्या आमदारांना दुसरीकडे हलवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
#WATCH | Two minibuses seen entering the premises of Jharkhand CM Hemant Soren's residence in Ranchi
— ANI (@ANI) January 31, 2024
A team of ED officials is at the residence of CM Soren for questioning in connection with a money laundering case linked to an alleged land scam. pic.twitter.com/ygIjppy8yF
नेमकं काय प्रकरण?
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची टीम सीएम सोरेन यांची चौकशी करत आहे. तपास यंत्रणा सीएम सोरेन यांची दुसऱ्यांदा चौकशी करत आहे. यापूर्वी 20 जानेवारी रोजी ईडीने त्यांची चौकशी केली होती. ईडीच्या चौकशीदरम्यान रांचीमध्ये जेएमएम समर्थकांचे निदर्शन सुरू आहे.
#WATCH | JMM (Jharkhand Mukti Morcha) workers gather at Morabadi Ground in Ranchi in protest against the ED probe of CM and party's Executive President, Hemant Soren. They are planning to march to Raj Bhavan. pic.twitter.com/j1zHCtTMfb
— ANI (@ANI) January 31, 2024
ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे अधिकारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान, हेमंत सोरेन यांनी एसटी-एससी पोलिस ठाण्यात ईडी अधिकाऱ्यांविरुद्धच एफआयआर दाखल केला. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीपासून रांचीपर्यंत छळ केल्याचा आरोप केला आहे.