मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:20 PM2024-11-28T23:20:17+5:302024-11-28T23:21:08+5:30
झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन ९ ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे...
झारखंडच्यामुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन गुरुवारी (28 नोव्हेंबर) प्रोजेक्ट भवनात पोहोचले. येथे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन ९ ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. जेएमएमचे ज्येष्ठ आमदार स्टीफन मरांडी यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे. ते आमदारांना शपथ देतील.
मैया सन्मान योजनेची रक्कम वाढवली -
मैया सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबरपासून दरमहा २५०० रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री सोरेन यांनी घेतला आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये मिळत होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान या योजनेची बरीच चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवून झामुमो पुन्हा एकदा सत्तेवर आल्याचे बोलले जात आहे.
आज अबुआ सरकार के शपथ ग्रहण के बाद लिए गए कुछ महत्वपूर्ण निर्णय-
— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 28, 2024
📌 मंईयां सम्मान योजना की सम्मान राशि बढ़कर मिलेगी 2500 रुपया
📌 राज्य में JPSC/JSSC के अंतर्गत होने वाली नियुक्ति प्रक्रिया को तेज किया जाएगा
📌 केंद्र सरकार के पास राज्य का बकाया 1 लाख 36 हजार करोड़ रुपए को लेने… pic.twitter.com/Oklw43jj9q
1 जानेवारी 2025 पूर्वी परीक्षा कॅलेंडर जारी होणार -
याच बरोबर, केंद्र सरकारकडे थकीत असलेल्या १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय, पोलीस नियुक्त्यांसाठी भविष्यातील परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे 1 जानेवारी 2025 पूर्वी सर्व रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी JPSC, JSSC आणि इतर प्राधिकरणांचे परीक्षा कॅलेंडर प्रकाशित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.