Jharkhand: ऑपरेशन लोटसमुळे आमदारांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:46 AM2022-08-29T06:46:44+5:302022-08-29T06:48:54+5:30

Operation Lotus in Jharkhand: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अपात्रतेबाबतचा आदेश कधी जारी केला जातो, याची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, ऑपरेशन लोटसच्या भीतीने मुख्यमंत्री तासा-तासाला रणनीती बदलत आहेत.

Jharkhand: MLAs on the run due to Operation Lotus | Jharkhand: ऑपरेशन लोटसमुळे आमदारांची पळापळ

Jharkhand: ऑपरेशन लोटसमुळे आमदारांची पळापळ

Next

- एस. पी. सिन्हा
रांची : झारखंडमध्ये वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेची प्रतीक्षा केली जात आहे. राज्यपाल रमेश बैंस यांनी निवडणूक आयोगाशी संवैधानिक मुद्द्यांबाबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अपात्रतेबाबतचा आदेश कधी जारी केला जातो, याची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, ऑपरेशन लोटसच्या भीतीने मुख्यमंत्री तासा-तासाला रणनीती बदलत आहेत.
आमदारांची एकजूट राखण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठी हेमंत सोरेन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत. मागील तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा झारखंडचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे रांचीमध्ये दाखल झाले व त्यांनी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. सर्व आमदारांना रांचीमध्येच वास्तव्यास राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री सोरेन हे पांडे यांची भेट घेण्यासाठी रांचीच्या मोरहबादीस्थित स्टेट गेस्ट हाऊसमध्ये गेले होते.
शनिवारीच हेमंत सोरेन हे महागठबंधनच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर आमदारांना बसमध्ये घेऊन बाहेर पडले होते. ऑपरेशन लोटसच्या भीतीने ते आमदारांना घेऊन छत्तीसगढमध्ये जात असल्याचे सांगितले जात होते. परंतु ते खुंटीच्या एका रिसॉर्टमध्ये गेले व 
पर्यटनाचा आनंद घेऊन रात्री 
रांचीमध्ये परतले.

Web Title: Jharkhand: MLAs on the run due to Operation Lotus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.