झारखंडच्या राजकारणात खळबळ, भाजपा प्रवेशाची चर्चा, दिल्लीत आलेले चंपई सोरेन म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 03:13 PM2024-08-18T15:13:58+5:302024-08-18T15:14:36+5:30

Jharkhand Political Crisis: झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत.

Jharkhand Political Crisis: Excitement in Jharkhand politics, talk of BJP entry, Champai Soren who came to Delhi said...   | झारखंडच्या राजकारणात खळबळ, भाजपा प्रवेशाची चर्चा, दिल्लीत आलेले चंपई सोरेन म्हणाले...  

झारखंडच्या राजकारणात खळबळ, भाजपा प्रवेशाची चर्चा, दिल्लीत आलेले चंपई सोरेन म्हणाले...  

झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांना प्रसारमाध्यमांनी गाठलं तेव्हा प्रतिक्रिया देताना चंपई सोरेन म्हणाले की, मी येथे माझ्या खासगी कामासाठी आलो आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत विचारलं असता त्यांनी मी सध्या जिथे आहे तिथेच आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंपई सोरेन यांनी सांगितले की, तुम्ही लोक ज्या प्रकारे मला प्रश्न विचारत आहात त्यावर मी काय बोलणार. मी सांगितलंय की मी इथे खासगी कामासाठी आलो आहे. तसेच मी जिथे आहे तिथेच राहणार आहे. त्यानंतर कोलकाला येथे सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारलं असता. चंपई सोरेन म्हणाले की, माझी कोलकात्यामध्ये कुणाशीही भेट झाली नाही. मी खासगी कामामुळे येथे आलो आहे. त्याबाबत नंतर तुम्हाला सांगेन.

दरम्यान, विमानतळावरून रवाना झाल्यानंतर चंपई सोरेन हे थेट झारखंड भवनच्या दिशेने गेले. तिथे त्यांच्या नावाने तीन खोल्यांचं बुकिंग झालेलं आहे. चंपई सोरेन यांच्यासोबत त्यांच्या खासगी स्टाफमधील काही लोकही दिल्लीमध्ये आले आहेत.

दुसरीकडे चंपई सोरेन यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी सांगितले की, चंपई सोरेन यांच्याबाबत अफवा पसरवली जात आहे. ते कुठेही जाणार नाहीत. चंपई सोरेन हे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व आहे.  

Web Title: Jharkhand Political Crisis: Excitement in Jharkhand politics, talk of BJP entry, Champai Soren who came to Delhi said...  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.