Jharkhand Political Crisis: झारखंडमध्येही काय झाडी, काय डोंगर...! सोरेन समर्थक आमदार बॅगा, साहित्य घेऊन आले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:12 PM2022-08-27T13:12:06+5:302022-08-27T13:15:10+5:30

Hemant Soren CM Seat in Problem: हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. खाण लीज प्रकरणाच्या चौकशीनंतर निवडणूक आयोगाने आपला अहवाल झारखंडच्या राज्यपालांना पाठवला आहे.

Jharkhand Political Crisis: Hemant Soren will send his MLAs with UPA mlas to Chhattisgarh for safety | Jharkhand Political Crisis: झारखंडमध्येही काय झाडी, काय डोंगर...! सोरेन समर्थक आमदार बॅगा, साहित्य घेऊन आले

Jharkhand Political Crisis: झारखंडमध्येही काय झाडी, काय डोंगर...! सोरेन समर्थक आमदार बॅगा, साहित्य घेऊन आले

Next

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री पदावर अपात्रतेची टांगती तलवार असताना आता तिथे सत्ता टिकविण्यासाठी कसरत सुरु झाली आहे. सोरेन यांनी आघाडीच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीला आमदार बॅगा भरून हजर होऊ लागले आहेत. यामुळे सोरेन आपल्या पक्षाच्या आमदारांसोबत आघाडीच्या आमदारांनाही दुसऱ्या राज्यात काय झाडी, काय डोंगर पाहण्यासाठी पाठविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

सोरेन यांनी सर्व आमदारांची ११ वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीला आलेल्या आमदारांच्या गाड्यांमध्ये बॅगा आणि इतर साहित्य दिसले आहे. झारखंडमधील यूपीएच्या आमदारांना छत्तीसगडमध्ये पाठवले जाऊ शकते. यूपीएचे मजबूत सरकार असलेल्या राज्यात आमदारांना पाठविले जाण्याची शक्यता आहे. 

हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. खाण लीज प्रकरणाच्या चौकशीनंतर निवडणूक आयोगाने आपला अहवाल झारखंडच्या राज्यपालांना पाठवला आहे. त्यात मुख्यमंत्री हेमंत यांना आमदारपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. सोरेन आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 
सोरेन यांच्यानंतर त्यांची पत्नी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. यामुळे सोरेन यांना पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सोरेन यांच्या निकटवर्तियाच्या ठिकाण्यांवर ईडीने काही दिवसांपूर्वीच छापे मारले होते. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हेमंत सोरेन यांना रांची जिल्ह्यातील अनगडा ब्लॉकमध्ये 0.88 एकर जमिनीची खाण लीज मिळाली होती. कागदपत्रांनुसार, हेमंत सोरेन यांनी 28 मे 2021 रोजी अर्ज केला आणि त्याला 15 जून 2021 रोजी मंजुरी मिळाली. यानंतर 9 सप्टेंबर रोजी पर्यावरण विभागाकडे मंजुरी मागितली होती, ती 22 सप्टेंबरला मिळाली. 11 फेब्रुवारी 2022 रोजी, भाजपने राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर हेमंत सोरेन यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी खाण पट्टा भाडेकरार परत केला होता. परंतू, त्याचे शुक्लकाष्ठ अद्याप मागे लागलेले आहे. 

Web Title: Jharkhand Political Crisis: Hemant Soren will send his MLAs with UPA mlas to Chhattisgarh for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.