धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:32 PM2024-10-02T16:32:18+5:302024-10-02T16:32:55+5:30

Jharkhand Railway Track Blast : माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Jharkhand Railway Track Blast : Railway track bombed in Jharkhand; A huge explosion shook the area | धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला

धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला

Jharkhand Railway Track Blast : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा अपघात घडवण्यासाठी रुळांवर दगड, सिलेंडर आणि लोखंडी खांब ठेवल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, आता झारखंडमधून यापेक्षाही धक्कादायक घटना घडली आहे. साहिबगंजमध्ये स्फोटकांनी चक्क रेल्वे ट्रॅकच उडवण्यात आला. लालमाटिया ते फरक्का, या एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. या भीषण स्फोटाने परिसर हादरुन गेला.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी(2 ऑक्टोबर) साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन हद्दीतील रंगा घुट्टू गावाजवळ लालमटिया ते फरक्का हा एमसीआर रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवण्यात आला. हा स्फोट इतका धोकादायक होता की, स्फोटानंतर रुळावर तीन फूट खोल खड्डा पडला. रेल्वे ट्रॅकपासून सुमारे 39 मीटर अंतरावर ट्रॅकचे तुकडे सापडले. तर, अधिकाऱ्यांना घटनास्थळावरुन स्फोटकांचे सामानही सापडले आहे.

माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे की, आणखी काही...याचा तपास केला जात आहे. एफएलएलच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

या रेल्वे मार्गाचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जातो
या स्फोटाचा आवाज एमजीआर रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या गावातील लोकांनाही ऐकू आला. घटनास्थळी पोल क्रमांक 42/02 वर कोळसा भरलेली ट्रेन उभी होती. ट्रॅक उडवल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकली नाही. दरम्यान, हा लालमाटिया ते फरक्का मार्ग फक्त कोळशाच्या वाहतुकीसाठी केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून आसाममधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना नॅशनल संथाल लिबरेशन आर्मीचे लोक या भागात सक्रिय आहेत. या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: Jharkhand Railway Track Blast : Railway track bombed in Jharkhand; A huge explosion shook the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.