Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकतायत 48 लोक, बचावकार्यात लष्करालाही येत आहेत अडचणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:27 PM2022-04-11T12:27:39+5:302022-04-11T12:28:31+5:30

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली.

Jharkhand trikut ropeway accident the Indian army and NDRF team is facing difficulties in rescue operations update | Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकतायत 48 लोक, बचावकार्यात लष्करालाही येत आहेत अडचणी 

Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकतायत 48 लोक, बचावकार्यात लष्करालाही येत आहेत अडचणी 

Next

झारखंडमधील सर्वात उंच असलेल्या, त्रिकूट रोपवेवर झालेल्या अपघातात अद्याप 48 जण हवेतच अडकलेले आहेत. या रोपवेवर रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ट्रॉलिज एकमेकांवर धडकल्या होत्या. यामुळे लोक पहाडावरच अडकले आहेत. एनडीआरएफ रात्री उशिरा बचाव कार्याला सुरुवात केली आहे. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र, अद्याप लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता आलेले नाही.

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आणि फिरण्यासाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा जवळपास दोन डझन ट्रॉलीज हवेतच होत्या. यानतंर घाईघाईने अनेकांना सुरक्षितपणे काढण्यात आले. तसेच, या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे.

हा अपघात होऊन साधारणपणे 20-22 तास झाले आहेत. मात्र, अद्यापही 48 जण हवेत अडकलेले आहेत. हे लोक एकूण 18 ट्रॉलीजमध्ये बसलेले आहेत. या लोकांचा बचाव करण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर जसे त्यांच्याजवळ पोहोचत आहे, तसे हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळे ट्रॉलीज हेलकावे खात आहेत. यामुळे त्यात बसलेल्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

ड्रोनच्या माध्यमानं पोहोचवलं जातंय अन्न-पाणी -
रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अथक प्रयत्नांनंतरही बचाव पथकाला अद्याप यश आलेले नाही. या अडकलेल्या लोकांपर्यंत ड्रोनच्या माध्यमाने अन्न-पाणी पोहोचवले जात आहे. ट्रॉलींमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आदींचा  समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री म्हणाले, 'सध्या रोपवे बंद आहे, ट्रॉली डिस्प्लेस झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एनडीआरएफसह लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे. यासंदर्भात कुठल्याही अफवेकडे लक्ष देऊ नये.
 

Web Title: Jharkhand trikut ropeway accident the Indian army and NDRF team is facing difficulties in rescue operations update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.