‘झिका’ लसीचा सर्वप्रथम भारतात शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2016 04:30 AM2016-02-04T04:30:18+5:302016-02-04T04:30:18+5:30

डासांपासून संक्रमित होणाऱ्या जीवघेण्या ‘झिका व्हायरस’वर जगात सर्वप्रथम लस शोधून त्याचे पेटंटही नोंदवल्याचा दावा हैदराबादच्या एका संस्थेने केला. या लसीची चाचणी घेण्यास थोडा अवधी लागेल

'Jhika' vaccine first invention in India! | ‘झिका’ लसीचा सर्वप्रथम भारतात शोध!

‘झिका’ लसीचा सर्वप्रथम भारतात शोध!

Next

नवी दिल्ली : डासांपासून संक्रमित होणाऱ्या जीवघेण्या ‘झिका व्हायरस’वर जगात सर्वप्रथम लस शोधून त्याचे पेटंटही नोंदवल्याचा दावा हैदराबादच्या एका संस्थेने केला. या लसीची चाचणी घेण्यास थोडा अवधी लागेल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘झिका’बाबत भारताला सतर्कतेचे निर्देश जारी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभर दिशानिर्देश जारी केले. गरोदर महिलांना या आजाराच्या संभाव्य संक्रमण क्षेत्रात प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.
‘झिका’वरील उपचाराचे पेटंट ९ महिन्यांपूर्वीच आम्ही नोंदवले. ही लस तयार करण्यास इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) अधिकृतरीत्या भारतात ‘झिका व्हायरस’ मागविले व त्यावर आम्ही संशोधन केले, असे हैदराबादच्या ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, संस्थेने दोन प्रकारची ‘झिका लस’ तयार केली आहे. माणसांवर व प्राण्यांवर त्याचे प्रयोग करण्यास आणखी वेळ लागेल. तथापि अवघ्या ४ महिन्यांत १० लाख झिका लस बनवण्यास संस्था समर्थ आहे. (विशेष प्रतिनिधी)
भारतात मोठ्या संख्येने असलेले ‘एडीस एजिप्टी’ प्रकारचे डास डेंग्यू पसरवतात. तेच ‘झिका व्हायरस’चा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकतात. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांच्या देखरेखीखाली ‘आयसीएमआर’ला विषाणू संशोधनाच्या प्राथमिकतेसह तातडीने आवश्यक सर्व उपाययोजनांचे आदेश दिले आहेत.
आम्ही या लसीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करीत असून तिचा वापर करण्याची शक्यता पडताळत आहोत. हे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत उत्पादनाचे चांगले उदाहरण आहे.
- डॉ. सोमय्या स्वामीनाथन,
आयसीएमआरचे संचालक

Web Title: 'Jhika' vaccine first invention in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.