वनडेत सर्वाधिक विकेट घेणा-या झुलन गोस्वामीला आईनं काढलं होतं घराबाहेर
By admin | Published: May 10, 2017 06:33 PM2017-05-10T18:33:38+5:302017-05-10T18:43:22+5:30
आयपीएलच्या झगमगाटात झुलन गोस्वामीचा विसर? घरात खाण्याची मारामार असलेली झुलन गोस्वामी कशी झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू?
Next
- मयूर पठाडे
आयपीएलचा झगमगाट आणि जस्टीन बिबरच्या मुंबईवारीत भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची कामगिरी अक्षरश: वाहून गेली असली तरी क्रिकेटचाहत्यांना कायमच तिची आठवण राहील. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने जबरदस्त कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये जगात सर्वाधिक बळी मिळण्याची अफलातून कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात काल तिनं भारतीय संघाला विजय तर मिळवून दिलाच, पण आपल्या वैयक्तिक कामगिरीचंही शिखरं गाठलं. 34 वर्षीय झुलननं 153व्या वन डे सामन्यांत 181 बळी मिळवून हा विक्रम आपल्या नावे केला. अगोदर ऑस्ट्रेलियाच्या कॅथरिन फिट्जपॅट्रिकच्या नावावर 180 बळींचा विक्रम होता.
1- नादिया एक्सप्रेस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरही झुलनची ख्याती आहे.
2- पाच फूट अकरा इंच उंची असलेल्या झुलनकडे चेंडूला उंची देण्याची कला अवगत आहे.
3- गरिबीत लहानपण गेलेल्या झुलनला मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागलं. पण त्यामुळे तिच्या क्षमतेत वाढही झाली.
4- मात्र सुरुवातीला अतिशय हळू बॉलिंग टाकत असल्यामुळे तिची खूपदा खिल्लीही उडवली गेली आणि ती टिंगलटवाळीचा विषय झाली होती. पण त्यातूनच तिला प्रेरणा मिळाली आणि ती पेटून उठली. मुलांपेक्षाही वेगात आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग करू लागली. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तेज गोलंदाज म्हणून तिची ख्याती आहे.
5- पश्चिम बंगालमधील नदिया इथली मूळची असलेल्या झुलनला क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठीही खूप आटापिटा करावा लागला.
6- पहाटे चार वाजता उठून ट्रेननं नादियाहून दक्षिण कोलकातामधील विवेकानंद पार्क येथे ती प्रॅक्टिसासाठी यायची.
7- एक दिवस क्रिकेट खेळून घरी परतायला रात्री उशीर झाला म्हणून तिच्या आईनं तिला कित्येक तास घराबाहेरच ठेवलं होतं.