मोठी दुर्घटनाः तेल टँकरनं लष्कर भरतीहून परतणाऱ्या 8 तरुणांसह 10 जणांना चिरडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 08:20 AM2019-09-25T08:20:15+5:302019-09-25T08:21:35+5:30
हरियाणातील जिंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री रामराय गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे.
जिंदः हरियाणातील जिंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री रामराय गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांना जागीच मृत्यू झाला आहे. यातील आठ तरुण हिसारमध्ये लष्करात भरतीत सहभागी झाल्यानंतर रिक्षानं परतत होते. त्याचदरम्यान हांसी रोडवरच्या रामराय गावाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या तेलाच्या टँकरनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्करात भरतीसाठी गेलेल्या तरुण शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झाले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते घरी परतत होते. त्यावेळीच ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना हांसी रोडवरच्या रामराय गावाजवळ रात्री जवळपास 10.30 वाजताच्या दरम्यान झाली आहे.
हिसारमध्ये लष्कराच्या भरतीत सहभाग घेतल्यानंतर ते तरुण रिक्षानं घरी परतत होते. त्याचदरम्यान पाठीमागून आलेल्या तेलाच्या टँकरनं रिक्षाला धडक देत तिला चिरडून तो टँकर पुढे निघून गेला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीची ओळख प्रेमजीत पुत्र सतीशच्या रूपात झाली आहे. जो बडताना येथे वास्तव्याला आहे. तीन मृतांची ओळख पटली असून, बाकी मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगिलतं आहे.Haryana: 10 died, 1 injured after an oil tanker rammed into their autorickshaw near Ramrai village in Jind last night. They were returning from an Army recruitment rally. Police says "Relatives informed.Some of these were cadets at military academy. Academy has been informed too" pic.twitter.com/WD1DTOmMK3
— ANI (@ANI) September 25, 2019