Farmers Protest : ...म्हणून शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:01 PM2021-02-27T16:01:53+5:302021-02-27T16:10:54+5:30
Farmers Protest And PM Narendra Modi : आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलक शेतकरी सरकारचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान काही आंदोलक शेतकर्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिल्याची घटना समोर आली आहे. तसेच या पत्राद्वारे संबंधित कायदे मागे घेण्याची आणि एमएसपी (MSP) लागू करण्याची मागणी केली आहे.
जींद येथील टोल नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेकडो शेतकर्यांनी इंजेक्शनद्वारे रक्त काढून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'हे काळे कायदे आम्हाला नको आहेत, त्याऐवजी सरकारने एमएसपीवर कायमस्वरूपी कायदे केले पाहिजेत' अशी मागणी त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील जींद जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्हाला हे तीनही काळे कायदे नको आहेत. हे तीन काळे कायदे परत घ्या आणि एमएसपीवर कायमस्वरुपी कायदा करा."
"देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू", राकेश टिकैत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/RjTVG8Jkbr#FarmersProstests#FarmersBill2020#RakeshTikait#NarendraModi#LalKrishnaAdvanipic.twitter.com/D6PEni8Y9p
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
"जींद टोल प्लाझा येथे आंदोलन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 63 दिवसांहून अधिक काळ आम्ही कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. असं असलं तरी अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही" त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. रक्ताने पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, जे शेतकरी गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना भगतसिंगांसारखं रक्तही देता येतं.
महिला शेतकरी सिक्कम, शेतकरी नेते विजेंदर सिंधू यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे कायदे कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओला (Reliance Jio) बसला आहे. रिलायन्स जिओला शेतकरी आंदोलनामुळेपंजाब आणि हरियाणात नुकसान सहन करावं लागलं आहे.
शेतकरी आंदोलनाचा फटका! Reliance Jio चं झालं मोठं नुकसान; युजर्सच्या संख्येत घट
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ट्रायने दिलेल्या डेटानुसार, डिसेंबर 2020 मध्ये फक्त पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांत रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घट झाली आहे. शेतकरी आंदोलनाची देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही झळ बसली आहे. कंपनीच्या पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाबमध्ये जिओचे 1.40 कोटी युजर्स होते. तर डिसेंबरच्या शेवटी ही संख्या 1.25 कोटींवर येऊन पोहोचली आहे.
"संपूर्ण कृषी उद्योग दोन मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची मोदींची इच्छा", राहुल गांधींचं टीकास्त्रhttps://t.co/6g3B1Rs6E5#FarmersProstest#FarmBills2020#RahulGandhi#NarendraModi#Congress#ModiGovtpic.twitter.com/C6Wu78Y9rz
— Lokmat (@MiLOKMAT) February 14, 2021