'मनमोहन सिंग यांनीच 'जिंदाल'ला कोळसा खाणी दिल्या'

By Admin | Published: September 21, 2015 05:35 PM2015-09-21T17:35:37+5:302015-09-21T17:36:29+5:30

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आढावा घेतल्यावरच जिंदाल समुहाला कोळसा खाणी देण्याचा निर्णय घेतला होता असा दावा माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव यांनी कोर्टासमोर केला आहे.

'Jindal' gives coal mines to Manmohan Singh | 'मनमोहन सिंग यांनीच 'जिंदाल'ला कोळसा खाणी दिल्या'

'मनमोहन सिंग यांनीच 'जिंदाल'ला कोळसा खाणी दिल्या'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ -  तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आढावा घेतल्यावरच जिंदाल समुहाला कोळसा खाणी देण्याचा निर्णय घेतला होता असा दावा माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव यांनी कोर्टासमोर केला आहे. मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स बजावण्याच्या मधू कोडा यांच्या मागणीचे समर्थन करत असल्याचे राव यांनी कोर्टाला सांगितले आहे. 

कोळसा घोटाळ्याप्रकरणी दसारी नारायणराव यांनी सोमवारी विशेष न्यायालयासमोर जबाब नोंदवला. झारखंडमधील मुर्गादंगल येथील कोळसा खाणी नवीन जिंदल समुहाला देण्याचा निर्णय मनमोहन सिंग यांनीच घेतला होता. मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता असे राव यांनी न्यायालयाला सांगितले. राव यांच्या जबाबामुळे मनमोहन सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

Web Title: 'Jindal' gives coal mines to Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.