ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 01:42 PM2018-02-26T13:42:19+5:302018-02-26T13:42:19+5:30

अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे.

Jinnah jinn in the heart of Owaisi, wants to break the country - Giriraj Singh | ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

Next

नवी दिल्ली- अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. त्यामुळेच ते देश तोडू इच्छितात, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत. काल ओवैसींनी बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असं विधान केलं होतं.

ओवैसी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी बाबरी मशिदीवर मुस्लिमांचा हक्क असल्याचा दावा केला होता. राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच लागले आणि त्यानंतर उद्ध्वस्त झालेली बाबरी मशीद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असा विश्वास ‘ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला होता.

ओवैसी म्हणाले होते की, आमची मशीद तेथे आहे, होती व तेथेच राहील. सर्वोच्च न्यायालय आमच्या हाती निकाल देईल तेव्हा मशीद पुन्हा होती तिथेच बांधली जाईल. सर्वोच्च न्यायालय श्रद्धेच्या आधारे नव्हे तर पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कोणाचेही नाव न घेता ओवैसी असेही म्हणाले होते की, हे लोक आम्हाला भीती घालत आहेत. आमच्या शरियतविरुद्ध ओरड करत आहेत. मशिद सोडून द्या, असे आम्हाला सांगत आहेत. पण काही झाले तरी आम्ही मशिद सोडणार नाही.

Web Title: Jinnah jinn in the heart of Owaisi, wants to break the country - Giriraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.