Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 08:52 AM2020-08-15T08:52:51+5:302020-08-15T08:53:15+5:30
रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे.
रिलायन्स जिओने भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्राहकांना विशेष ऑफर जाहीर केली आहे. JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट खरेदी केल्य़ानंतर ग्राहकांना पुढील 5 महिने मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे.
JioFi ची किंमत 1999 रुपये ठेवण्यात आली असून याचा फायदा उठविण्यासाठी आधी JioFi चा एखादा प्लॅन निवडावा लागणार आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून JioFi हॉटस्पॉट खरेदी करावे लागणार आहे. यानंतर जिओ सिम अॅक्टिव्हेट झाले की ग्राहकांना डिव्हाईस कार्यरत करण्यासाठी तीनपैकी एक प्लॅन निवडावा लागणार आहे. JioFi मध्ये टाकलेले सिम सुरु झाले की पुढील तासापासून ही ५ महिन्यांची ऑफर लागू होणार आहे. अॅक्टिव्हेशन स्टेटस MyJio अॅपवर पाहता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवरूनही JioFi हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.
रिलायन्स जिओचा सर्वाधिक परवडणारा प्लॅन 199 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय एक्स्ट्रा 99 रुपये दिल्यावर Jio Prime मेंबरशिप मिळते. डेटासह जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर 1000 मिनिट दिले जात आहेत. तसेच 100 एसएमएस पाठविता येणार आहेत.
दुसरा प्लॅन 249 रुपयांचा असून त्यामध्ये रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. अन्य सुविधा 199 प्लॅन सारख्याच आहेत. तिसरा प्लॅन 349 रुपयांचा आहे. रोज 3 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये मोफत कॉलिंग, एसएमएस सारखे फायदे आहेत. नव्या ऑफरनुसार 5 महिने मोफत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत 2999 रुपये असून 2018 मध्ये लाँच करण्यात आला होता. याआधी कंपनीने 2017 मध्ये पहिला फिचरफोन जियोफोन (JioPhone) बाजारात आणला होता. JioPhone 2 ची किंमत 2999 रुपये आहे. या फोनला आता कंपनी अधिकृत वेबसाईटवर 141 रुपयांच्या ईएमआयद्वारे विकत आहे. या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2000 एमएएचची बॅटरी, 4जी, क्वार्टी की पॅड आहे. याचसोबत 512 एमबीची रॅम आणि 4 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 128 जीबी वाढविता येते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल