संसदेवर हल्ला करून ' जैश-ए-मुहम्मद' घेणार 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला?

By admin | Published: October 10, 2016 09:12 AM2016-10-10T09:12:44+5:302016-10-10T09:15:16+5:30

लष्कराच्या जवानांनी 'पाकव्याप्त काश्मीर'मध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला घेण्यासाठी 'जैश-ए-मोहम्मद' संसदेवर हल्ला करण्याचा कट रचला आहे.

'Jism-e-Muhammad' to attack Parliament, 'Change the surgical strike'? | संसदेवर हल्ला करून ' जैश-ए-मुहम्मद' घेणार 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला?

संसदेवर हल्ला करून ' जैश-ए-मुहम्मद' घेणार 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला?

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० -  'उरी' हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी 'पाकव्याप्त काश्मीर'मध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये  ३८ जणांचा खात्मा केला. याचाच बदला घेण्यासाठी ' जैश-ए-मोहम्मद' या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरने भारताच्या ' संसदे'वर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. याची गंभीर दखल घेत गुप्तचर यंत्रणा तसेच जम्मू-काश्मीकमधील सीआयडी अधिका-यांना सावध करण्यात आले आहे. 
(२०११मध्येही सर्जिकल स्ट्राईक, ३ पाकी जवानांचे शिरच्छेद?)
 
मिळालेल्या माहितीनुसार, ' जैश-ए-मोहम्मद'चे अतिरेकी संसदेवर मोठा हल्ला करण्याचा कट आखत आहेत. काही आत्मघातकी दहशतवादी संसदेवर हल्ला करू शकतात. तसेच मंत्रालय, अक्षरधाम मंडिर व लोटस टेम्पलही अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याचे समजते. ' जास्त गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करावे' अशी सूचना 'जैश'च्या दहशतवाद्यांना देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 
यापूर्वी अफझल गुरूच्या नेतृत्वाखाली ' जैश-ए-मोहम्मद'च्या अतिरेक्यांनी डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला चढवला होता. 

Web Title: 'Jism-e-Muhammad' to attack Parliament, 'Change the surgical strike'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.