UP Elelction: “कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:03 PM2021-06-10T14:03:04+5:302021-06-10T14:04:06+5:30
UP Elelction: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election) रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election) रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय, असे जितीन प्रसाद यांनी म्हटले आहे. (jitin prasad says that i joined BJP for national interest)
भाजप देशहित आणि पुढील पीढीसाठी काम करत आहे. त्यामुळे मी या देशहिताच्या कार्यात सहभागी झालो आहे. कोणत्याही पदासाठी किंवा स्वार्थासाठी भाजपप्रवेश केला नाही, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. काँग्रेस पक्ष जनतेपासून दूर गेला आहे. जनतेच्या अपेक्षेनुसार काँग्रेस काम करत नाहीए. मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो, तेथे काँग्रेसला काहीच महत्त्व राहिलेले नाही, असेही जितीन प्रसाद म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय
काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला आहे
काँग्रेस पक्षात नेतृत्व बदलाची गरज आहे. गेल्या ६ ते ७ वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. अनेकदा याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे कोणीच ऐकून घेतले नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, आता भाजपमध्ये आलोय, तर पक्ष सांगेल, ती जबाबदारी पार पाडेन, असेही प्रसाद यांनी सांगितले.
कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली
सर्वजण टीका करण्यास स्वतंत्र आहेत
जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावर बोलताना जितीन प्रसाद म्हणाले की, प्रत्येकाला टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही. प्रत्येकाची टीका ही प्रसाद म्हणून स्वीकारतो. ज्यांची विचारसरणी लहान आहे, ती तशीच राहणार आहे. मी घेतलेला निर्णय योग्य असून, तो देशहिताचा ठरू शकेल, अशा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.
ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका
दरम्यान, जितिन प्रसाद यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.