J&K Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये एनकाउंटर, सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांची घेराबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 08:40 AM2022-05-08T08:40:18+5:302022-05-08T08:40:34+5:30

J&K Encounter: कुलगाममध्ये मध्यरात्रीपासून गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी ठार झाले होते.

J&K Encounter: Encounter in Kulgam, Security forces cordon off terrorists | J&K Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये एनकाउंटर, सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांची घेराबंदी

J&K Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये एनकाउंटर, सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांची घेराबंदी

Next

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कुलगामच्या देवसर परिसरात पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलाच्या घेराबंदीत जैश-ए-मोहम्मदचे 2 ते 3 दहशतवादी अडकले आहेत. सध्या या चकमकीबाबत लष्कराकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रात्री उशिरापासून गोळीबार सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. शहरातील सफाकदल भागातील आयवा पुलाजवळ ही घटना घडली. सकाळी 8.40 च्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

3 हिजबुल दहशतवादी ठार
मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांची कारवाई सुरूच आहे, जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी मारले गेले. जिल्ह्यातील पहलगाम भागातील श्रीचंद वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर देत तिघांचा खात्मा केला. 

200 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात 
नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते की, खोऱ्यातील घुसखोरीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र असे असतानाही 200 दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. खोऱ्यातील अंतर्गत भागात सध्या 40 ते 50 स्थानिक दहशतवादी आणि विदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. सुरक्षा जवानांनी आतापर्यंत 21 विदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत असल्याची माहितीही द्विवेदी यांनी दिली.

Web Title: J&K Encounter: Encounter in Kulgam, Security forces cordon off terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.