जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:07 PM2019-08-25T17:07:48+5:302019-08-25T17:09:33+5:30
श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय.
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच पाहायला मिळणार आहे. इंडिया टुडेशी बोलताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधल्या सर्वच सरकारी कार्यालयांवर तिरंगा लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तिथे दोन झेंडे फडकत होते.
कलम 370 हटविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, जम्मू काश्मीरमध्ये आता वेगळा झेंडा फडकणार नाही, तसेच येथील लोकांसाठी दुहेरी नागरिकत्व राहणार नाही. जम्मू-काश्मीरचं पुनर्रचना विधेयक आणून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर त्या प्रदेशाचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. कधी काळी जम्मू-काश्मीरचं स्वतंत्र संविधान, झेंडा आणि दंड संहिता होती. परंतु अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आता तिथे भारतातले कायदे लागू झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधल्या इमारतीवर यापुढे भारताचा तिरंगाच पाहायला मिळणार आहे. राज्यात पहिल्यांदा कोणत्याही बाहेर व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नव्हती, परंतु आता जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही बाहेरील व्यक्तीला जमीन खरेदी करता येणार आहे.#JammuAndKashmir: State flag removed from Civil Secretariat building in SRINAGAR, only tricolor seen atop the building. pic.twitter.com/bwo6bOMNZi
— ANI (@ANI) August 25, 2019
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारनं तिथे सुरक्षेच्या कारणास्तव 35 हजारांहून अधिक सुरक्षा जवान काश्मीर खोऱ्यात तैनात केले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर तीन आठवड्यांनी जमावबंदी काढून टाकण्यात आली आहे. रस्त्यावर पहिल्यासारखीच लोकांची ये-जा सुरू झाली असून, विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत आणि कॉलेजला जात आहेत. सरकारी कार्यालयातही सुरळीत कामकाज सुरू झाले आहे.Jai Ho🇮🇳
— Major Surendra Poonia (@MajorPoonia) August 25, 2019
After removal of Article 370,today separate flag of old J&K state removed from Civil Secretariat of Srinagar. Now only National Flag Tiranga🇮🇳is flying & flying high💪#OneNationOneFlagOneLawpic.twitter.com/EKZWYiMMpl