भाजपाचे लोक भगवी वस्त्रं घालून महिलांची अब्रू लुटतात; हेमंत सोरेन यांची वादग्रस्त टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:50 PM2019-12-18T16:50:43+5:302019-12-18T17:15:47+5:30
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर वादग्रस्त टीका
पाकूर: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त टीका केली आहे. आज देशात महिलांना जिवंत जाळलं जात आहे. इथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी भगवी वस्त्रं घालून फिरत असल्याचं मला समजलं. हे भाजपाचे नेते लग्न कमी करतात. मात्र भगवी वस्त्रं घालून महिलांची अब्रू लुटण्याची कामं करतात, असं वादग्रस्त विधान सोरेन यांनी केलं. पाकूरमध्ये झालेल्या जनसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी पाकूर येथील सभेत योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर अतिशय वादग्रस्त टीका केली. भाजपाचे नेते महिलांची अब्रू लुटण्याची कामं करतात, असं विधान त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करताना सोरेन यांची जीभ घसरली आणि भाजपा नेते भगवी वस्त्रे घालून महिलांची अब्रू लुटतात, असं वक्तव्य त्यांनी केलं.
Hemant Soren, JMM in Pakur: Aaj desh mein bahut-betiyon ko jalaya ja raha hai...Mujhe pata chala ki idhar UP CM Yogi ji bhi chakkar laga rhe hain gerua pehen ke. Ye woh log hain BJP ke log jo shaadi kum karte hain lekin gerua pehen bahu-betiyon ki izzat lootne ka kaam karte hain pic.twitter.com/NeRBTdrmAJ
— ANI (@ANI) December 18, 2019
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली होती. यापैकी चार टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान २० डिसेंबरला होईल. त्यावेळी १६ मतदारसंघांमधले मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यासह मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी लुईस मरांडी आणि रणधीर सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.