JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 09:08 AM2024-10-23T09:08:49+5:302024-10-23T09:12:16+5:30

Jharkhand Election 2024 : हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना गांडेय मतदारसंघातून आणि भाऊ बसंत सोरेन यांना दुमका मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

JMM releases first list of 35 candidates, CM Hemant Soren to contest from Barhait, wife Kalpana from Gandey | JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

JMM Candidate List 2024:  झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ३५ जागांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बरहेट मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना गांडेय मतदारसंघातून आणि भाऊ बसंत सोरेन यांना दुमका मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

जेएमएमने राजमहलमधून एमटी राजा, बोरियोमधून धनंजय सोरेन, महेशपूरमधून स्टीफन मरांडी, शिकारीपाडामधून आलोक सोरेन, नालामधून रवींद्रनाथ महतो, मधुपूरमधून हफिजुल हसन, सारठमधून उदय शंकर सिंग, गिरिडीहमधून सुदिव्य कुमार, डुमरीमधून बेबी देवी, चंनदक्यारीतून उमाकांत रजक, टुंटीमधून मथुरा प्रसाद महतो, बहरगोडामधून समीर मोहंती, घाटशिलामधून रामदास सोरेन, पोटकामधून संजीव सरदार आणि जुगलसलाईमधून मंगल कालिंदी यांना उमेदवारी दिली आहे.

याशिवाय, ईचागढमधून सबिता महतो, चाईबासामधून दीपक बिरुआ, माझगावमधून निरल पूर्ती, मनोहरपूरमधून जगत मांझी, खरसावांमधून दशरथ गागराई, तामाडमधून विकास मुंडा, तोरपामधून सुदीप गुडिया, गुमलामधून भूषण तिर्की, लातेहारमधून बैद्यनाथ राम, गढवामधून मिथिलेश ठाकूर, जमुआमधून केदार हाजरा, भवनाथपूरमधून अनंत प्रताप देव, सिमरियामधून मनोज चंद्रा, सिल्लीमधून अमित महतो, बरकठ्ठामधून जानकी यादव, धनवरमधून निजामुद्दीन अन्सारी आणि लिट्टीपारामधून हेमलाल मुर्मू यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, झारखंडमधील ४० जागांवर जेएमएम निवडणूक लढवणार आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर मतदान होणार आहे. उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात असल्याचे म्हटले जात आहे.
 

Web Title: JMM releases first list of 35 candidates, CM Hemant Soren to contest from Barhait, wife Kalpana from Gandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.