हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचा 2017च्या ज्ञानपीठ पुरस्कारानं होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 05:14 PM2017-11-03T17:14:11+5:302017-11-03T17:25:39+5:30

नवी दिल्ली- साहित्य क्षेत्रात दिला जाणारा देशातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झालाय.

Jnanpith award for 2017 to be given to writer, Hindi writer, Krishna Sobti | हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचा 2017च्या ज्ञानपीठ पुरस्कारानं होणार सन्मान

हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचा 2017च्या ज्ञानपीठ पुरस्कारानं होणार सन्मान

Next

नवी दिल्ली- साहित्य क्षेत्रात दिला जाणारा देशातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झालाय. ज्ञानपीठचे संचालक लीलाधर मंडलोई यांच्या मते, साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी 2017ला दिला जाणारा 53वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना दिला जातोय.

पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात कृष्णा सोबती यांना 11 लाख रुपये, प्रशस्तिपत्र आणि प्रतीक चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. कृष्णा सोबती यांना 1980 साली ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1996मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही देऊनही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कृष्णा यांच्या लेखणीतून उतरलेली जिंदगीनामा, ऐ लड़की, मित्रो मरजानी, जैनी मेहरबान सिंह यांसारखी पुस्तकं लोकांच्या पसंतीस उतरली. 2014मध्ये भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यापूर्वी वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), विंदा करंदीकर या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 

Web Title: Jnanpith award for 2017 to be given to writer, Hindi writer, Krishna Sobti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.