ज्येष्ठ गुजराती लेखक रघुवीर चौधरीं यांना ज्ञानपीठ पुरस्कार
By Admin | Published: December 29, 2015 05:48 PM2015-12-29T17:48:21+5:302015-12-29T17:48:21+5:30
भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. आज ५१ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांचे नाव निच्छित करण्यात आले आहे. अधिकृत परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
वरिष्ठ साहित्य समालोचक नामवर सिंह यांच्या अध्यक्षीतेखीलील समीतीने रघुवीर चौधरी यांची निवड केली आहे. १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला असून त्यांनी कविता, नाटकाशिवाय साहित्यप्रकरात विपूल लेखन केलं आहे. १९७७ साली त्यांच्या ‘उप्रवास कथात्रयी’ यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
रघुवीर चौधरी यांच्यापुर्वी गुजराती साहित्यिकांमध्ये उमा शंकर जोशी यांना १९६७ साली , १९८५ला पन्नालाल पटेल आणि २००१ मध्ये राजेंद्र शाह यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरुप असतं.