जेएनयू देशद्रोही घोषणा प्रकरण; कन्हैयाकुमारला एक दिवसाची पोलीस कोठडी

By admin | Published: February 25, 2016 08:56 PM2016-02-25T20:56:11+5:302016-02-25T20:56:11+5:30

जेएनयू प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. जेएनयूतील देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैयाकुमारला दिल्ली सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

JNU anti-trafficking episode; Kanhaiyakumar gets a day's police custody | जेएनयू देशद्रोही घोषणा प्रकरण; कन्हैयाकुमारला एक दिवसाची पोलीस कोठडी

जेएनयू देशद्रोही घोषणा प्रकरण; कन्हैयाकुमारला एक दिवसाची पोलीस कोठडी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - जेएनयू प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाचा आरोप असलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारला दिल्ली सत्र न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना दिल्ली न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 
मंगळवारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना कन्हैय्या कुमारने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास सांगितला होता. कन्हैय्या कुमारने आपल्या जामीन याचिकेत आपण कोणत्याही प्रकारच्या देशद्रोही घोषणा दिल्या नसल्याच सांगितलं होतं.

Web Title: JNU anti-trafficking episode; Kanhaiyakumar gets a day's police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.