JNU Attack : 'भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा मिळते'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:31 PM2020-01-06T13:31:42+5:302020-01-06T13:32:00+5:30

JNU Attack : जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी

JNU Attack : 'India, a country where cows get more protection than students', twinkle khanna | JNU Attack : 'भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा मिळते'

JNU Attack : 'भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा मिळते'

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आली आहे. या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसह आता क्रिकेट आणि बॉलिवूडमधूनही या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर, अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विट करून एका वर्तमानपत्राची बातमी शेअर केली आहे. त्यासोबतच, भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळतं, असेही तिने म्हटले आहे. ''भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेंक्षा गायींनी अधिक सुरक्षा मिळते. पण, हा तोच देश आहे ज्याने कुणाच्या भितीने जगण्यास स्पष्ट नकार दिलाय. आपण, हिंसा करून लोकांवर दबाव निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे, अजून जास्त विरोध होणार, आंदोलन होणार, रस्त्यावर जादा लोकं उतरणार...'' असे ट्विट ट्विंकल खन्नाने केलं आहे.

जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या हल्ल्याचे पडसात मुंबईतही दिसत असून जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली. 

हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थी
सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19  विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.

Web Title: JNU Attack : 'India, a country where cows get more protection than students', twinkle khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.