ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:09 IST2020-01-16T16:07:37+5:302020-01-16T16:09:16+5:30

जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून केला होता.

jnu attack : She not me! The claim of Komal Sharma | ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा

ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या टोळक्याने मोडतोड करून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा केला होता. तसेच या स्कार्फधारी हल्लेखोरांपैकी एक तरुणी ही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी आणि एबीव्हीपीची सदस्य कोमल शर्मा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता कोमल शर्मा हिने ती तरुणी आपण नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्यावर आरोप करून बदनाम केल्याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

 यासंदर्भात अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''कोमल शर्मा हिने महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आपले नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच संबंधित वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणासाठी आपल्याशी संपर्कही साधला नाही, असे तिने म्हटले आहे.'' 


 जेएनयूमधील हिंसाचार प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी कोमल शर्मा हिची ओळख ही शर्टावरून पटवली आहे. त्यावेळी तिने फिकट निळ्या रंगाचा स्कार्फ परिधान केला होता. तिच्या हातात काठी होती. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

Web Title: jnu attack : She not me! The claim of Komal Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.