JNU Attack : जेएनयूवरील हल्ल्यावर काय म्हणाल? लष्करप्रमुखांनी दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 08:40 PM2020-01-11T20:40:48+5:302020-01-11T20:41:44+5:30

माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयूवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

JNU Attack: What do you think on attack on JNU? The answer given by the army chief Manoj Naravane | JNU Attack : जेएनयूवरील हल्ल्यावर काय म्हणाल? लष्करप्रमुखांनी दिले हे उत्तर

JNU Attack : जेएनयूवरील हल्ल्यावर काय म्हणाल? लष्करप्रमुखांनी दिले हे उत्तर

Next

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 18 जणांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण होते. दिल्ली पोलिसांनी मारहाणकर्त्यांऐवजी मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल केले होते. आज देशाचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जेएनयूबाबत भाष्य केले. 


माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयूवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर पत्रकारपरिषदेमध्ये नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. जेएनयूच्या नावावर राष्ट्रीय सुरक्षा अकादमी एनडीएची पदवी दिली जाते. त्याच विद्यापीठामध्ये वादंग सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांवर मास्कधारी हल्लेखोरांनी मारहाण केली होती. याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एवढे सगळे घडत असताना तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने विचारला. 


यावर नरवणे यांनी सांगितले की, एनडीए देशाची सर्वोत्तम संस्था आहे. मी देखील त्याच एनडीएमधून आलोय ज्या एनडीएमध्ये सध्याचे हवाईदल प्रमुख आणि नौसेना प्रमुख आले आहेत. एनडीच्या कार्यप्रणालीची अनेक उदाहरणे दिली जातात. 
मात्र नरवणे यांनी जेएनयू हल्ला आणि वादावर बोलणे टाळले. रावत यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यांना सैन्यदलातूनही विरोध झाला होता. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. 


PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....
 

 संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असेही नरवणे यांनी म्हटले होते. 
 

Web Title: JNU Attack: What do you think on attack on JNU? The answer given by the army chief Manoj Naravane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.