JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी

By Admin | Published: February 15, 2016 03:48 PM2016-02-15T15:48:47+5:302016-02-15T17:03:17+5:30

सोमवारी दुपारी पतियाळा न्यायालयामध्ये जवळपास 40 वकिलांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विरोधात घोषणा दिल्या असून या परीसरामध्ये वातावरण तंग झालं आहे.

JNU Case: Patiala advocates' ruckus at Patiala House Court | JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी

JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - सोमवारी दुपारी पतियाळा न्यायालयामध्ये जवळपास 40 वकिलांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विरोधात घोषणा दिल्या असून या परीसरामध्ये वातावरण तंग झालं आहे. देशद्रोही वर्तनाबद्दल अटक केलेल्या कन्हय्या कुमारला कोर्टात हजर करण्यात येत असताना हा प्रकार घडला. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या वकिलांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली तसेच विद्यार्थ्यांच्या पाठिराख्यांना कोर्टातून हुसकावण्याचा प्रयत्न केला.
भारतमाता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा देणा-या वकिलांनी विद्यार्थ्यांवर आणि पत्रकारांवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजल गुरूवरून झालेलं रणकंदन शमण्याची चिन्हे नसून भाजपा विरूद्ध डावे व अन्य असा संघर्ष उफाळलेला दिसत आहे. देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या अनेक प्राध्यापकांनी कन्हय्या कुमारवर लावलेला देशद्रोहाचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीतल्या कोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी कन्हय्या कुमारला अटक करण्यात आली होती आणि त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
तर दुसराकीडे भाजप आमदार ओ पी शर्मा आणि त्यांच्या समर्थकांनी पतियाळा न्यायालयाबाहेर अज्ञात व्यक्तीला मारहाण केलीये. ओ पी शर्मा यांच्याकडे याबाबतची विचारणा केली असता पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणा-याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो, मारहाण करत नव्हतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिल.

Web Title: JNU Case: Patiala advocates' ruckus at Patiala House Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.