जेएनयूमधील शुल्कवाढ रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 06:14 IST2019-11-14T06:14:48+5:302019-11-14T06:14:53+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने अखेर माघार घेत वसतिगृह शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला.

जेएनयूमधील शुल्कवाढ रद्द
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने अखेर माघार घेत वसतिगृह शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. जेएनयू कार्यकारी समितीच्या बैठकीत वसतिगृहासह व इतर शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला. आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अर्थसा' देण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. दरम्यान, बुधवारीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.
वसतिगृहात सिंगल रुमसाठी २० रुपये मसिक शुल्कात ५८० रूपयांची वाढ करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून ६००रूपये घेण्यात येणार होते. तर डबल रुमसाठी १० रुपयांऐवजी ३०० रुपये आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.