JNU विद्यापीठातील सिक्युरिटी गार्डची झेप, रशियन लँग्वेज Entrance Exam क्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 07:45 PM2019-07-18T19:45:51+5:302019-07-18T19:47:22+5:30
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील रहवासी असलेल्या कमजल मीणा याने राजस्थान विद्यापीठातून राज्यशास्त्र, इतिहास आणि इंग्रजीत पदवी परीक्षा पास केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाने आपल्या शैक्षणिक कामगिरीने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. विद्यापीठात नोकरी करणाऱ्या कमजल मीणा याने आपल्या शिक्षणाच्या धडपडीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 34 वर्षीय मीणा याने बीए रशियन मध्ये प्रवेश मिळविण्यासाठीची जेएनयुची प्रवेश परीक्षा म्हणजे एन्ट्रान्स टेस्ट पास केली आहे. याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील रहवासी असलेल्या कमजल मीणा याने राजस्थान विद्यापीठातून राज्यशास्त्र, इतिहास आणि इंग्रजीत पदवी परीक्षा पास केली आहे. शिक्षणासाठी 30 किमी दूर जात असल्याचे मीणा याने सांगितले. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे नोकरीच्या शोधात मीणाने दिल्ली गाठली. त्यावेळी 2014 मध्ये त्यास जेएनयुमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली. सध्या मीणाचे मासिक वेतन 15 हजार रुपये आहे. मी विदेशी भाषा शिकून परदेशात जाऊ इच्छितो, त्यासोबतच मला स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असल्याचेही मीणा याने म्हटले आहे. जेएनयुबाबत खूप अफवा पसरवल्या जातात ज्या चुकीच्या असल्याचेही मीणा याने म्हटले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनीही कमजलचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांचे जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मीणासाठीही शक्य तितकी मदत आम्ही करू, असेही जगदीश कुमार यांनी म्हटले. मीणा हे सध्या आपल्या पत्नी आणि तीन मुलींसह दिल्लीत एका रुममध्ये राहत आहेत. जेएनयूने मला समाजासोबत राहण्याचा मार्ग शिकवला. येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केलंय. आता ते सर्व मला शुभेच्छा देत आहेत. मला असं वाटतंय, जसं की मी एका रात्रीत प्रसिद्ध झालोय, असे मीणा याने म्हटले.