जेएनयूच्या 48 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:09 PM2018-08-24T17:09:38+5:302018-08-24T17:10:35+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) 48 प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने पाठविली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) 48 प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने पाठविली आहे.
नोटीस पाठविलेल्या 48 प्राध्यापकांनी 31जुलै रोजी झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. जेएनयूचे उप कुलगुरुंच्या नवीन कायद्यांचा विरोधात एक दिवसीय आंदोलन पुकारले होते. दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी 48 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून हा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठाकडून पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, जे आंदोलन होते ते विद्यापीठाच्या मर्यादेच्या विरुद्ध, विद्यापीठाच्या नियम आणि अटींच्या विरोधात आहे. आम्ही खूप विचलित झालो आहोत. कारण, शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा लोकशाहीत असणारा हक्क हे विद्यापीठ कायदा आणि वैधतेच्या दृष्टीने पाहत आहे, असे जेएनयूच्या प्राध्यापिका आयेशा किडवाई यांनी सांगितले.