जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?

By Admin | Published: May 14, 2016 08:31 AM2016-05-14T08:31:28+5:302016-05-14T09:12:34+5:30

काही महिन्यांपूर्वीच राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या विवादात सहभागी होऊन त्याचा फायदा उठवण्याचा आदेश इसिसने आपल्या दहशतवाद्यांना दिला होता.

JNU-Kanhaiyya controversy was to take advantage of this? | जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?

जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना आगामी काळात भारतात अनेक कारवाया करणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती, मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या विवादात सहभागी होऊन त्याचा ( आपल्या कारवायांसाठी) फायदा उठवावा, असा आदेश आपल्याला देण्यात आल्याचे भारतातील इसिसच्या रिक्रूटर्सनी ( भरती करण्याची जबाबदारी असणारे) दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. 
'जुनुद अल खलीफा-ए-हिंद' (जेकेएच) या भारतातील 'इसिस'च्या शाखेतील ३ रिक्रूटर्स आशिक अहमद उर्फ राजा, मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफजल या तिघांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातून अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. 
१९ फेब्रुवारी रोजी कन्हैयाकुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरूंगात होता व त्याची सुटका व्हावी यासाठी अनेक विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याचवेळी 'इसिस'च्या अहमद अलीने पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय आशिक अहमद उर्फ राजाला या आंदोलनात सहभागी होऊन गाड्यांची जाळपोळ तसेच तोड-फोड करण्याची सूचना दिली होती. तसेच देशात अस्थिरतेच वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी चिथावणी देऊन हे आंदोलन आणखी भडकावण्याची इसिसची योजना होती, असेही एनआयएच्या अधिका-यांनी सांगितले. 
दरम्यान एनआयएने प्रथमच इसिस जोडल्या गेलेल्या व्यक्तीचे नोंदवले असून ते भारतीय दंडविधानाच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. या तिघांनी आपल्या जबानीत आपण बंगळुरू, पश्चिम बंगाल व पंजाबमधील बैठकीत उपस्थित होतो, हे कबूल केले आहे. 
आशिकने दिलेल्या जबाबानुसार, अहमद अली हा स्वत:ची अन्सर-उत तौहीद फि बिलाद अल-हिंद (AuT) अशी ओळख सांगत असे. १९ फेब्रुवारी रोजी त्याने 'ट्रिलियन अॅप'वरील अकाऊंटद्वारे माझ्याशी संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणा आपल्यावर नजर ठेऊन आहेत असे त्याने मला सांगितले. ' यावेळी देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलन सुरू असून आपण त्याचा फायदा उठवला पाहिजे. या आंदोलनात सहभागी होऊन गाड्यांची जाळपोळ करावी असेही तो मला म्हणाला, असे आशिकने नमूद केले. 
हा अहमद अली म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून भारतातील इसिसचा प्रमुख शफी अरमार असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला असून तो नुकताच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. 
 
 

Web Title: JNU-Kanhaiyya controversy was to take advantage of this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.