दिल्लीच्या निकालावर कन्हैय्या कुमारचा 'शायराना अंदाज', पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:42 PM2020-02-12T15:42:18+5:302020-02-12T15:44:45+5:30
आम आदमी पक्षाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दिल्लीतील निवडणुकीत जेएनयुतील मारहाण
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आपच्या विजयानंतर देशभरातून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे कौतुक होत आहे.
आम आदमी पक्षाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दिल्लीतील निवडणुकीत जेएनयुतील मारहाण आणि शाहिनबाग हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे भाजपानेही देशभक्ती आणि देशद्रोही असा प्रचार निवडणुकीच्या रिंगणात केल्याचं दिसून आलं. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिष्ट नेते कन्हैय्या कुमार यांनीही दिल्लीतील विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, मोघम स्वरुपात प्रतिक्रिया देताना, दिल्लीतील जनतेबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. कारण, कन्हैय्या कुमारने आपल्या ट्विटमध्ये कुठेही अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले नाही, वा त्यांना शुभेच्छाही दिल्या नाहीत. मात्र, त्यांच्या ट्विटचा रोख हा दिल्ली निकालाकडे होता हे स्पष्ट दिसत आहेत. कारण, दिल्ली विधानसभेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच त्यांनी ट्विट केलं आहे.
ये दिल्ली है मेरे यार
बस इश्क, मोहब्बत, प्यार
अशा शायराना अंदाजात कन्हैय्याने दिल्लीच्या निकालावर भाष्य केलंय.
ये दिल्ली है मेरे यार
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) February 11, 2020
बस इश्क़, मोहब्बत, प्यार 💞
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीमधे आम आदमी पार्टीला (आप) लोकांनी पुन्हा संधी देऊन विकासाला मत दिले असून, धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त होती. देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपचे कौतुक करत अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत