जेएनयू देशातलं सर्वोत्तम विद्यापीठ; मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:26 AM2020-01-16T10:26:21+5:302020-01-16T10:31:21+5:30

यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला

JNU is our top university says HRD minister after 18 students qualified for UPSC IES examination | जेएनयू देशातलं सर्वोत्तम विद्यापीठ; मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक

जेएनयू देशातलं सर्वोत्तम विद्यापीठ; मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक

Next

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या (आयईएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेले ३२ पैकी १८ विद्यार्थी एकट्या जेएनयूचे असल्यानं अतिशय आनंद झाल्याचं निशंक यांनी म्हटलं आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जेएनयू देशात कायमच अव्वल असल्याचं आपण आधीही म्हटलं होतं, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

यूपीएससीच्या आयईएस परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी १० जानेवारी २०२० रोजी जाहीर झाली. या यादीत ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातले तब्बल १८ विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे आहेत. भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या. यामुळे जेएनयूतल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 

५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले. त्यामुळे पुन्हा एकदा जेएनयू देशभरात चर्चेत आलं. जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजपा आणि अभाविपनं केला. तर जेएनयूला सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणानं वागत असून विद्यापीठाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप डाव्यांकडून करण्यात आला. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर उजव्या संघटना टीका करत असताना दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं. 
 

Web Title: JNU is our top university says HRD minister after 18 students qualified for UPSC IES examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.