JNU Protest : दीपिका पादुकोण ही तुकडे गँगची सदस्या; भाजपा खासदार साक्षी महाराजांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:52 PM2020-01-08T19:52:49+5:302020-01-08T20:00:25+5:30
दीपिकालाच फायद्याचे ठरले असून तिचे फॉलेअर्सही वाढले आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने काल सायंकाळी जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. यावरून तिच्या आगामी छपाक सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली होती. तर सोशल मिडीयावर टीकाही झेलावी लागली होती. मात्र, तिथे जाणे दीपिकालाच फायद्याचे ठरले असून तिचे फॉलेअर्सही वाढले आहेत.
या वादावर भाजपाचे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी वक्तव्य केले आहे. दीपिका पादुकोण ही तुकडे तुकडे गँगचीच असल्याचे म्हटले आहे. दीपिका पादुकोन हिने मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. एवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak अशी मोहीम दीपिकाविरुद्ध राबविण्यात आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या हिसेंचं समर्थन करणाऱ्या लोकांनी दीपिकाला देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केली होती. तसेच लोकांनी तिचा आगामी छपाक सिनेमा पाहू नये, असं आवाहन करण्यात येत होतं. दीपिका पदुकोनला धडा शिकवण्यासाठी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं आवाहन करण्यात आले होते. अनेक युजर्सने दीपिकाला देशविरोधी म्हणत अनफॉलो केले.
शुक्रवारी दीपिकाचा छपाक सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटात तिने अॅसिड अटॅक पीडितेची भूमिका साकारली आहे. चित्रपटाआधीच झालेल्या या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाला मोठे नुकसान होईल, अशी शक्यता होती. मात्र याउलट घडले आहे. या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाच्या ट्विटरवरील फॉवर्समध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात दीपिकाचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढल्याचे सोशल मीडिया एनालिटीक्स करणाऱ्या Socialblade या वेबसाईटने सांगितले आहे.
'छपाक' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच झापले
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपिकाला तुकडे तुकडे गँगची सदस्या म्हणताना त्यांनी यामध्ये काही परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे.
तर जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशीवर भाजपाच्या आणखी एका नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य आले आहे. तिला खरेच जखम झाली होती की रंग लावला होता याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. जेएनयूमधील हिंसाचार तिच्याच सांगण्यावरून झाला होता असा आरोपही बंगालचा भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी केला आहे.