JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 03:46 PM2020-01-28T15:46:54+5:302020-01-28T15:54:38+5:30
JNU Protest : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे.
पाटणाः जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे. शरजील इमामनं देशद्रोही विधान केल्यानं तो चर्चेत आला होता. त्यानं ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरजीलच्या विरोधात देशद्रोह आणि धार्मिक तेढ वाढवण्यासह अनेक गंभीर आरोप करत अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल केलं गेलं होतं. त्याला मंगळवारी बिहारच्या जहानाबादमधून अटक करण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.
शरजील हा बिहारच्या जहानाबादमधला रहिवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम जेडीयूचे नेते राहिले आहेत. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावरून जहानाबादवरून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शरजील कारण नसताना फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला आहे. शरजील इमामचा तपास क्राइम ब्राँचच्या पाच टीम करत होत्या. त्याच्याविरोधात सहा राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bihar Chief Minister Nitish Kumar on JNU student Sharjeel Imam arrested in Jahanabad (Bihar) by Delhi Police: Nobody should do anything that is not in the interest of the nation. The accusations & the arrest, court will decide on the matter. https://t.co/niLq6ouavIpic.twitter.com/9k42VIR32V
— ANI (@ANI) January 28, 2020
बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केलं आहे. शरजीलच्या अटकेनं पोलीस बिहारबरोबर मुंबई व दिल्लीतही छापेमारी केली आहे. नेपाळला पळून जाण्याची शक्यता पाहता बिहार-नेपाळच्या सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.