जेएनयूमध्ये कन्हैकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न
By admin | Published: March 10, 2016 08:22 PM2016-03-10T20:22:28+5:302016-03-10T20:45:39+5:30
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारवर गुरुवारी संध्याकाळी जेएनयूच्या आवारात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारवर गुरुवारी संध्याकाळी जेएनयूच्या आवारात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एका इसमाने जेएनयूच्या आवारात कन्हैयाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
कन्हैयाला आपल्याला धडा शिकवायचा आहे असे हा इसम सांगत होता. हल्ला करणारी व्यक्ती विद्यापीठाबाहेरील असून, सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढले. देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कन्हैयाची मागच्या आठवडयात तिहार तुरुंगातून सर्शत जामिनावर सुटका झाली आहे.
तेव्हापासून कन्हैया विविध कार्यक्रमांमुळे प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. कन्हैया जेएनयूमध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करतो.
#Flash Man allegedly tries to attack JNUSU President Kanhaiya Kumar in JNU campus. pic.twitter.com/Uoj262R7fY
— ANI (@ANI_news) March 10, 2016