JNU Violence : '...लोखंडी रॉडने हात-पाय तोडले', विद्यार्थ्यांनी सांगितला घडलेला प्रकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:31 AM2020-01-06T09:31:16+5:302020-01-06T09:33:48+5:30
जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे.
नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारात अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. तसेच, विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड झाली. दरम्यान, दोन गटात हाणामारी कशामुळे झाली याबाबत माहिती समोर येत आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे.
शिवम चौरसिया हा विद्यार्थी अभाविपचा सदस्य असून तो जेएनयूमध्ये पीएचडी करत आहे. त्यांने सांगितले की, त्यांचावर रॉडने हल्ला करण्यात आला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घातले. याशिवाय, जेएमयूमध्ये झालेला हा सर्व प्रकार रजिस्ट्रेशनवरून झाल्याचे शिवम चौरसिया याने सांगितले. अभाविपचे सदस्य मनीष हा सुद्धा जेएनयूमध्ये पीएचडी करत आहे. काल झालेल्या हल्ल्यात मनीष सुद्धा जमखी झाला आहे. हल्ल्यात हात फॅक्चर झाल्याचे मनीषने सांगितले.
जेएनयूमध्ये M-Phil चे विद्यार्थी शेषमणि याने सांगितले की, या हल्ल्यात हात फॅक्चर झाला आहे. हाताला प्लास्टर घातले असून रॉड घातला आहे. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच, सेमिस्टरसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. मात्र, डाव्या संघटनेचे विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु देत नव्हते. तसेच, यावर डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी क्लासवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न सुरु केला होता. याशिवाय, जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार होते, त्यांचे WiFi कनेक्शन कापले होते. तसेच, ज्यांनी ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारहाण केली, असेही शेषमणि या विद्यार्थाने सांगितले.
दरम्यान, कालच्या हाणामारीत सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19 विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हिंसाचाराचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
#WATCH Delhi: 'Delhi police, go back' slogans raised during the flag march conducted by police inside Jawaharlal Nehru University (JNU) campus. pic.twitter.com/w5OYN3DAo0
— ANI (@ANI) January 5, 2020
बुरखाधारी हल्लेखोर जेएनयूमध्ये घुसले आणि पोलीस बघत बसले. रा. स्व. संघ आणि भाजपाला भारताचे काय करायचे आहे हे सोबतच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. पण आम्ही त्यांना यात यशस्वी होऊ देणार नाही.
- सिताराम येचुरी, मार्क्सवादी नेते
आमचे जीव धोक्यात आहेत! सुमारे एक हजार ‘नक्षलीं’नी आज ‘जेएनयू’मध्ये हैदोस घातला. प्रशासकीय भवन आणि साबरमती व पेरियार हॉस्टेलमधून बाहेर काढून आमच्या ५० हून अधिक सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
- दुर्गेश कुमार, अध्यक्ष, अभाविप जेएनयू
‘जेएनयू’मधील हिंसाचाराने मलाजबर धक्का बसला. विद्यापीठांतच विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर या देशाचे भले कसे होणार? पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
महत्त्वाच्या बातम्या
जेएनयूतील हिंसाचाराचा मुंबईतही नोंदवला निषेध
जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी