JOB Alert : खूशखबर! भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:59 PM2021-06-26T19:59:36+5:302021-06-26T20:06:07+5:30
Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये (Indian Coast Guard Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. असिस्टंट कमांडंटसाठी (Assistant Commandant) 50 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे इंडियन कोस्ट गार्डने आपल्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 50 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 जुलैपासून सुरू होणार आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट कमाडंट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 4 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. इंडियन कोस्टगार्डच्या माहितीनुसार, एकूण असिस्टंट कमांडंटच्या 50 पदांवर भरती होणार आहे. जनरल ड्युटीसाठी 40 जागा भरल्या जातील यामध्ये 11 जागा खुल्या, ईडबल्यूएससाठी 3, ओबीसीसाठी 7, एससीसाठी 6 आणि एसटीसाठी 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#Job#JobAlerthttps://t.co/JHU9veMyWj
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021
टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 10 जागांवर भरती होणार आहे. इंडियन कोस्टगार्डमध्ये जनरल ड्युटी पदावर अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिल्पोमा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अँड प्रोडक्शन, आटोमोटिव, किंवा मरिन आकर्किटेक्चर यामधील पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Hydraulic Power Corporation) अप्रेंटीस (Apprentice Jobs) पदांसाठी भरती आहे. नोटिफिकेशननुसार, ट्रेड अॅप्रेंटिसच्या एकूण 11 रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाईट nhpc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी ITI पास असणं गरजेच आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC / ST साठी पाच वर्षे, OBC साठी तीन वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी 10 वर्षांची सवलत असेल.
JOB Alert : तरुणांसाठी खुशखबर! आयटी कंपन्यांमधील रोजगारनिर्मितीचं चित्र सुखावणारं #job#IT#JOBAlerthttps://t.co/GIHIBdzsrW
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2021