JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 04:31 PM2021-05-19T16:31:48+5:302021-05-19T16:42:30+5:30
Indian Railways Recruitment : रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे.
पदाचे नाव
अप्रेंटिस
पदांची एकूण संख्या
पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात 3591 पदावंर अप्रेंटिससाठी संधी देण्यात येणार आहे.
पात्रता
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणं गरजेचं आहे. तसेच संबंधित ट्रेड मधील ITI सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे.
उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
अर्जाचे शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या पश्चिम विभागाच्या वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज करावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.