JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार 69,100 रुपये पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 03:22 PM2021-07-11T15:22:36+5:302021-07-11T15:29:57+5:30

Indian Navy Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

JOB Alert join indian navy recruitment 2021 for 350 vacancies salary up to 69100 rs | JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार 69,100 रुपये पगार

JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार 69,100 रुपये पगार

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment 2021) दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलाने नाविक एमआर( Sailor MR) पदाच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज हे 19 जुलैपासून सुरू होतील आणि 23 जुलै 2021 पर्यंत ते स्वीकारले जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. भारतीय नौदलात शेफ, स्टीवॉर्ड आणि हायजिनिस्ट या पदांसाठी जवळपास 350 जागा आहेत. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान जन्मलेले उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात.

शारीरीक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 7 मिनिटांत 1.6 किमी धावणे,  20 स्क्वाट्स आणि 10 पुश-अप करता येणं आवश्यक आहे.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. या दरम्यान त्यांना प्रतिमहिना 14,600 रुपये स्टायपेंड दिलं जाईल.

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल -3 अंतर्गत 21,700 रुपये ते 69,100 रुपये महिन्याचं वेतन दिले जाईल. 

उमेदवारांना DA व्यतिरिक्त दरमहा 5200 रुपये MSP देखील देण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 19 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जुलै 2021

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्ट (पीएफटी) साठी उमेदवारांचं शॉर्टलिस्टिंग हे दहावीच्या टक्केवारीच्या आधारे केलं जाईल. 

रिक्त जागा राज्यनिहाय पद्धतीने देण्यात आल्या असल्याने कट ऑफ मार्क्स प्रत्येक राज्यात वेगवेगळे असू शकतात.

एकूण 350 रिक्त जागांकरिता सुमारे 1750 उमेदवारांना लेखी चाचणी व फिजिकल फिटनेस टेस्टसाठी (पीएफटी) बोलावले जाईल. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: JOB Alert join indian navy recruitment 2021 for 350 vacancies salary up to 69100 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.