JOB Alert : खूशखबर! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 280 जागांवर भरती; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:19 PM2021-06-08T14:19:25+5:302021-06-08T14:25:43+5:30
NTPC Recruitment 2021: इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीमध्ये (NTPC) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ट्रेनी (Executive Engineer Trainee) पदासाठी 280 जागांवर भरती करण्यात येत आहे. भरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एनटीपीसीने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची (NTPC Recruitment 2021) अंतिम तारीख 10 जून आहे. त्यामुळं इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज काळजीपूर्वक भरावा, त्यात काही त्रुटी आढळल्यास, अर्ज नाकारला जाईल, असं या नोटीफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोण करू शकतं अर्ज?
या पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या आणि गेट परीक्षा (GATE Exam) उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे या परीक्षेचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत सूचना पाहता येईल.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या वर्गांना नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी ntpccareers.net वर उपलब्ध असलेली अधिसूचना चेक करा.
अर्ज कसा करावा?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाइटच्या होम पेजवर रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये जा आणि संबंधित पोस्टवर क्लिक करून नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने अर्ज भरू शकता. अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंटआऊट घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.